Kanda Bajarbhav : कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो सध्या कांद्याच्या बाजारभावात रोजाना वाढ होत आहे. सध्या कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल ते 2800 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सर्वसाधारण बाजार भाव मिळत आहे.
एवढेच नाही तर कमाल बाजार भाव तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन ठेपला आहे. यामुळे निश्चितच कांदा उत्पादक शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव उमटत आहेत.
शिवाय आगामी काळात कांद्याची उपलब्धता आणि कांद्याची मागणी याचा विचार केला असता कांद्याच्या बाजारभावात अजूनच वाढ होण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवली जात आहे.
जाणकार लोकांनी कांदा लवकरच 60 रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज वर्तवला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, कांदा पिकाला हवामान बदलाचा मोठा फटका बसलेला आहे.
प्रमुख कांदा उत्पादक राज्य कर्नाटक मध्ये काढणीसाठी आलेल्या कांदा पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात बाजारात कांद्याचा मोठा शॉर्टेज निर्माण होणार आहे.
म्हणजे बाजारात कांद्याची आवक कमी राहील आणि साहजिकच यामुळे बाजारभावात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्याची कांदा उत्पादनाची परिस्थिती पाहता भविष्यात कांदाचा मोठा तुटवडा जाणवणार आहे.
त्यामुळे भविष्यात कांद्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा किमान बाजार भाव आणि सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा कमाल बाजारभाव मिळण्याची शक्यता जाणकार लोकांकडून वर्तवण्यात आले आहे.
यामुळे निश्चितच उत्पादक शेतकरी बांधवांना अच्छे दिन येणार असल्याचे जाणकार लोक नमूद करत आहेत. मित्रांनो मात्र असे असले तरी या दरवाढीचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना होणार आहे.
खरं पाहता मध्यंतरी झालेल्या अतिवृष्टीमुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कांदा उत्पादनात घट झाली आहे शिवाय कांदा पिकाचा दर्जा देखील खालावला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना कांद्याचे दर वाढलेले असताना देखील याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे.
कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे मत
मित्रांनो महाराष्ट्रात सर्वाधिक नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादित केला जातो. नासिकला कांद्याचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. सध्या जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी शेतकरी बांधव लगबग करत असल्याचे चित्र आहे.
मात्र परतीच्या पावसामुळे कांदा रोपवाटिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे साहजिकच कांदा लागवड करण्यासाठी कांदा रोपांची मोठी कमतरता भासत आहे. शेतकरी बांधव आता इतर शेतकऱ्यांकडून कांद्याची रोपे विकत घेत आहेत. मात्र कांदा रोपासाठी शेतकऱ्यांना अधिकचा पैसा मोजावा लागत आहे. यामुळे साहजिकच शेतकरी बांधवांना कांदा लागवडीसाठी अधिक खर्च करावा लागत आहे.
शिवाय आता कांदा बाजार भावात वाढ झाली असल्याने कांदा लागवडीत देखील वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे भविष्यात याचे बाजार भाव कायम राहिले तर शेतकरी बांधवांना कांदा लागवडीतून दोन पैसे शिल्लक राहतील अन्यथा कांदा लागवडीसाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांच्या माथी पडणार आहे. दरम्यान सध्या मिळत असलेल्या वाढीव दराचा फायदा बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांना होत आहे. कारण की, राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात अजूनही नवीन कांदा काढणीसाठी आलेला नाही.
सध्या बाजारपेठेत शेतकरी बांधवांनी कांदा चाळीत साठवलेला जुना कांदा विक्रीसाठी येत आहे. कांदाचाळीत साठवलेला कांदा हवामान बदलामुळे मोठ्या प्रमाणात सडला असून याचे वजन देखील कमी झाले आहे.
शेतकऱ्यांनी जर तीन ट्रॅक्टर कांदा कांदा चाळीस साठवला असेल तर त्यांना आता केवळ दिड ट्रॅक्टर कांदा मिळत आहे. निश्चितच याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे कांदा दरात वाढ झाली असली तरी याचा फायदा खूपच कमी शेतकऱ्यांना होत आहे.
राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समिती मधील आजचे कांदा बाजार भाव
मुंबई कांदा बटाटा मार्केट :- मुंबई कांदा बटाटा मार्केट कांदा लिलावासाठी विशेष ओळखले जाते. या एपीएमसी मध्ये आज दहा हजार १४६ क्विंटल कांदा आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज 2200 प्रतिक्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3200 प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2700 प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती :- पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दहा हजार 838 क्विंटल लोकल कांद्याचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज एक हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून तीन हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला कृषी उत्पन्न बाजार समिती :- येवला एपीएमसीमध्ये आज 8000 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज 300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव कांद्याला मिळाला असून 3 हजार 71 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2300 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
येवला अंदरसुल कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये देखील आज तीन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज कांद्याला सहाशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 3165 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 2450 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ अर्थातच लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा लिलावासाठी संपूर्ण भारतात ख्यातीप्राप्त आहे. या एपीएमसी मध्ये आज 7905 क्विंटल उन्हाळी कांद्याचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज कांद्याला 1 हजार 100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजारभाव मिळाला असून तीन हजार अकरा रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 2561 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- मनमाड एपीएमसी मध्ये आज 3600 क्विंटल एवढी उन्हाळी कांद्याची आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज 1300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2870 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 2600 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज खेड चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 3000 क्विंटल कांद्याचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज कांद्याला 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 2 हजार 500 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल बाजारभाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव दोन हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज दोन हजार क्विंटल एवढी लाल कांद्याचे आवक झाली. या एपीएमसी मध्ये आज 1500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव लाल कांद्याला मिळाला असून 2800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजारभाव 2475 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.