Petrol Price Today : देशामध्ये दररोज पेट्रोल व डिझेलच्या किमतीत चांगलीच वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र चांगलीच कात्री लागली आहे. आज शनिवारी देखील दरवाढ कायम आहे.
आज पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात ८० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी ६ वाजल्यापासून नवीन दर लागू झाले आहेत.
हे दिल्लीचे (Delhi) दर आहेत
सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल 97.81 रुपये प्रतिलिटर मिळत होते. त्याच वेळी, आता 80 पैशांच्या वाढीसह त्याची किंमत 98.61 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. जिथे आधी डिझेलची किंमत 89.07 रुपये होती. आता शनिवारपासून त्याची किंमत 89.87 रुपये प्रति लिटर झाली आहे.
पाच दिवसात पेट्रोल एवढे महागले
कंपन्यांकडून (companies) तेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने लोकांचे बजेट बिघडू शकते. गेल्या 5 दिवसात तेलाच्या किमती 4 वेळा वाढल्या आहेत. म्हणजेच पाच दिवसांत पेट्रोल आणि डिझेल 3.20 रुपयांनी महागले आहे.
आता वाढू शकते
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. या दोन्हींच्या किमती पुन्हा एकदा प्रतिलिटर 80 पैशांनी वाढवण्यात आल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आणखी वाढू शकतात.
नुकसान झाले होते
मूडीजच्या अहवालानुसार, तेल कंपन्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली नव्हती, ज्यामुळे त्यांना 19,000 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले होते.