अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी २८० क्विंटल विविध फळांची आवक झाली होती. यामध्ये डाळिंबाची ६९ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १००० ते १५ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची १७ क्विंटल आवक झाली होती. मोसंबीला प्रतिक्विंटल १००० ते ६००० रुपये भाव मिळाला.
पपईची २३ क्विंटल आवक झाली होती. पपईला प्रतिक्विंटल १ हजार ते ३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सीताफळाची ४ क्विंटल आवक झाली होती. सीताफळाला प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये भाव मिळाला.

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अननसाची ४ क्विंटल आवक झाली होती. अननसाला प्रतिक्विंटल १५०० ते ४००० रुपये भाव मिळाला. सफरचंदाची ५ क्विंटल आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल १० हजार ते २२ हजार ५०० रुपये भाव मिळाला. पेरूची ५५ क्विंटल आवक झाली होती. पेरूला प्रतिक्विंटल १००० ते ५००० रुपये भाव मिळाला. नारळाची १ क्विंटल आवक झाली होती. नारळाला प्रतिक्विंटल २ हजार ५०० रुपये भाव मिळाला.
तोतापुरी आंब्याची ३८ क्विंटलवर आवक झाली होती. तोतापुरी आंब्यांना १५०० ते ३००० रुपये भाव मिळाला. दशेरी आंब्याची आडीच क्विंटल आवक झाली होती. दशेरी आंब्यांना प्रतिक्विंटल ५००० रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची २६ क्विंटल आवक झाली होती. ड्रॅगन फ्रूटला प्रतिक्विंटल २ हजार ते ७हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
खजुराला ४००० रु. मिळाला भाव
खजुराची ५ क्विंटलवर आवक झाली होती. खजुराला प्रतिक्विंटल ४००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. केळीची १० क्विंटलवर आवक झाली होती. केळीला प्रतिक्विंटल १६०० ते २००० रुपये भाव मिळाला.