अहमदनगर जिल्ह्यातील ह्या बाजार समितीत सोयाबीन 6300 रुपये क्विंटल व कांदा @ 3800 !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :-  राहाता बाजार समितीत काल सोमवारी लाल आणि उन्हाळी या दोन्ही कांद्याच्या 7359 गोण्यांची आवक झाली. प्रतिक्विंटल उन्हाळी कांद्याला जास्तीत जास्त 3800 तर लाल कांद्याला 3200 रुपये इतका भाव मिळाला.(ahmednagar bazar bhav soybean)

तर सोयाबिनला जास्तीत जास्त 6300 रुपये इतका भाव मिळाला. राहाता बाजार समितीत उन्हाळी कांदा नंबर 1 ला 3200 ते 3800 रुपये तर लाल कांद्याला 2700 ते 3200 असा भाव मिळाला.

कांदा उन्हाळी नंबर 2 ला 2350 ते 3150 रुपये लाल कांद्याला 1750 ते 2650 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला उन्हाळी 1200 ते 2300 रुपये तर लाल कांद्याला 700 ते 1700 भाव मिळाला.

गोल्टी उन्हाळी कांद्याला 2500 ते 2700 रुपये व लाल कांद्याला 2100 ते 2300 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला उन्हाळी 200 ते 1100 रुपये व लाल कांदा 100 ते 500 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या 94 क्रेटसची आवक झाली. डाळिंब नंबर 1 ला 76 ते 100 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 51 ते 75 रुपये असा भाव मिळाला. डाळिंब नंबर 3 ला 26 ते 50 रुपये भाव मिळाला.

डाळिंब नंबर 4 ला 10 ते 25 रुपये भाव मिळाला. सोयाबीनची 22 क्विंटल आवक झाली. सोयाबिनला कमीत कमी 6254 ते जास्तीत जास्त 6300 रुपये भाव मिळाला.

तर सरासरी 6275 असा भाव क्विंटलला मिळाला. मकाला 1541 रुपये प्रतिक्विंटलला मिळाले. गहू 2100 रुपये, मठ 8761 रुपये, बाजरीला 2041 प्रति क्विंटलला भाव मिळाला.

हरभरा डंकी 3726 रुपये तर चिकू कमीत कमी 1000 रुपये तर जास्तीत जास्त 2250 रुपये व सरासरी 2000 रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe