Soybean Bajarbhav: सोयाबीनचे आजची बाजारभावाची स्थिती पाहिली तर यातील बहुतांशी बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर ही 5100 ते 5600 प्रति क्विंटल पर्यंत राहिल्याचे दिसून आले.
बऱ्याच बाजार समितीमध्ये आवक देखील मंदावलेलीच असून शेतकरी बंधूंना भाववाढीची अपेक्षा असल्यामुळे हव्या त्या प्रमाणात आवक होत नसल्याचे सध्या बाजार समितीमध्ये चित्र दिसून येत आहे. तसेच आता आंतरराष्ट्रीय पातळीवर काही बाबींचा आधार सोयाबीनदाराला मिळण्याचे शक्यता असल्यामुळे बाजार भाव वाढतील ही अपेक्षा आहे.
त्या पार्श्वभूमीवर जर आपण आजच्या काही बाजार समितीतील सोयाबीन दराचा विचार केला तर हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमाल 5590 रुपयांचा दर मिळाला. तसे पाहायला गेले तर कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती बऱ्याच बाजार समितीमध्ये आज दिसून आली. याच अनुषंगाने आपण राज्यातील काही महत्त्वाच्या बाजार समितीमधील सोयाबीनच्या आजच्या बाजारभावांची माहिती घेऊ.
त्यातील काही निवडक बाजार समितीमधील सोयाबीनचे आवक आणि सोयाबीनचे दर
1- हिंगोली बाजारसमिती- हिंगोली बाजार समितीचा विचार केला तर आज या ठिकाणी 605 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. झालेल्या लिलावात कमीत कमी पाच हजार ते जास्तीत जास्त पाच हजार पाचशे नव्वद रुपये इतका बाजार भाव सोयाबीनला मिळाला. बाजारभावाचे सरासरी ही 5295 प्रतिक्विंटल इतकी राहिली.
2- कारंजा बाजारसमिती- कारंजा बाजार समितीमध्ये आज 5 हजार क्विंटल सोयाबीनची आवक होऊन झालेल्या लिलावात सोयाबीनला कमीत कमी पाच हजार एकशे वीस ते जास्तीत जास्त 5525 इतका दर मिळाला. बाजारभावाचे सरासरी ही 5410 रुपये इतकी राहिली.
3- अकोला बाजारसमिती- अकोला बाजार समितीत आज 3042 इतकी सोयाबीनची आवक झाली व झालेल्या लिलावात कमीत कमी 4800 ते जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास रुपये इतका दर मिळाला. भावाचे सरासरी ही 5350 रुपये प्रति क्विंटल इतकी राहीली.
4- यवतमाळ बाजारसमिती- यवतमाळ बाजार समितीत 697 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली व झालेल्या लिलावात सोयाबीनला किमान 5000 ते कमाल 5450 रुपये इतका दर मिळाला. भावाचे सरासरी ही 5225 रुपये इतकी राहिली.
5- वाशिम बाजारसमिती- वाशिम बाजार समितीमध्ये आज 600 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. झालेल्या लिलावामध्ये किमान पाच हजार पन्नास ते कमाल 5450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. भावाची सरासरी 5250 इतकी राहिली.
6- भोकर बाजारसमिती- भोकर बाजार समितीमध्ये सोयाबीनची 115 क्विंटल आवक झाली. झालेल्या लिलावात किमान चार हजार ते कमाल 5450 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. भावाचे सरासरी 4725 रुपये इतकी राहिली.
7- जिंतूर बाजारसमिती- जिंतूर बाजार समितीमध्ये आज 513 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. झालेल्या लिलावात किमान 5100 रुपये ते कमाल 5561 रुपये इतका बाजार भाव मिळाला. भावाची सरासरी 5450 रुपये इतकी राहिली.
8- नागपूर बाजारसमिती- नागपूर बाजार समितीत आज 449 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. झालेल्या लिलावात किमान 4700 ते कमाल 5400 इतका बाजार भाव मिळाला. भावाची सरासरी 5225 रुपये प्रति क्विंटल इतकी राहिली.
9- मोर्शी बाजार समिती- मोर्शी बाजार समितीत आज 402 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. झालेल्या लिलावात किमान 5200 ते कमाल 5450 रुपये प्रतिक्विंटल इतका बाजार भाव मिळाला. भावाचे सरासरी 5325 इतकी राहिली.
10- केज बाजारसमिती- केज बाजार समितीत आज 290 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. झालेल्या लिलावात किमान 5271 आणि कमाल 5450 इतका दर मिळाला. भावाची सरासरी 5350 इतकी राहीली.