अहिल्यानगर- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात सोमवारी विविध फळांची २२१ क्विंटल आवक झाली होती. कालच्या तुलनेत फळांची आवक घटली आहे. यावेळी मोसंबीला ४ हजार, तर डाळिंबांना १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.
अहिल्यानगर बाजार समितीत सोमवारी डाळिंबांची ३२ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १६ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. तर मोसंबीची १ क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी मोसंबीला २ हजार रुपये ते ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सफरचंदाची ४ क्विंटलवर आवक झाली होती. सफरचंदाला प्रतिक्विंटल १६ हजार ते २३ हजार ५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

पपईची २४ क्विंटल आवक झाली होती. पपईला ८०० ते २५०० रुपये भाव मिळाला. अननसाची १ क्विंटलवर आवक झाली होती. अननसाला २००० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पेरूची २९ क्विंटल आवक झाली होती. पेरूला प्रतिक्विंटल १ हजार ते ५ हजार रुपये भाव मिळाला. तोतापुरी आंब्यांची ४० क्विंटल आवक झाली होती. तोतापुरी आंब्यांना प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये भाव मिळाला. निलम आंब्यांची ५ क्विंटलवर आवक झाली होती. निलम आंब्यांना प्रतिक्विंटल ३००० रुपये भाव मिळाला.
ड्रॅगन फ्रूटला ७००० रुपये भाव
केळीची ५० क्विंटलवर आवक झाली होती. केळीला १७०० ते २००० रुपये भाव मिळाला. खजुराची दीड क्विंटल आवक झाली होती. खजुराला प्रतिक्विंटल ४ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. ड्रॅगनची २३ क्विंटलवर आवक झाली होती. ड्रॅगनला प्रतिक्विंटल २००० ते ७००० रुपये भाव मिळाला.