Kanda Market : आंनदाची बातमी ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाले असे बाजारभाव

Published on -

Kanda Market : नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये गुरूवारी (दि. ६) कांद्याला दोन हजारांचा भाव मिळाला आहे. हा उच्चांकी भाव असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसल्यामुळे कांद्याच्या पिकासाठी केलेला खर्च देखील वसूल होत नव्हता. त्यातच यंदा कांदा काढणीवेळी आलेल्या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर कांदा खराब झाला होता.

त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाले होते. परत उरलेला कांदा शेतकऱ्यांनी चाळीत साठवला. काही शेतकऱ्यांनी तर कांदा चाळ तयार करण्यासाठी जवळ असलेले सर्व पैसे खर्च केले होते. मात्र चाळीत ठेवलेला कांदा देखील खराब होण्यास सुरूवात झाली होती.

मात्र बाजारात कांद्याच्या दरात कोणत्याही प्रकारची वाढ होत नसल्याने कांदा ठेवला तर खराब होण्याचा धोका व विक्रीसाठी आनला तर हातात दोन रूपये देखील पडतील की नाही याची शंका. यामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी अवस्था शेतकऱ्याची झाली होती.

यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. अशातच कांद्याचे भाव वधारल्याने शेतकरी वर्गाला थोडा दिलासा मिळाला आहे. गुरूवारी नेप्ती कांदा मार्केट मध्ये तब्बल ३५९ ट्रक भरून कांद्याची आवक झाली होती. १ लाख ७४ हजार ७६ गोण्यांमध्ये ५९ हजार ११२ क्विंटल कांदा विक्रीला आला.

या पैकी १ नंबर कांद्याला १५०० ते २००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला तर २ नंबर कांद्याला १००० ते १५०० रुपये प्रती क्विंटल, ३ नंबर कांद्याला ६०० ते १००० रुपये प्रती क्विंटल आणि ४ नंबर कांद्याला २०० ते ६०० रुपये प्रती क्विंटल भाव मिळाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News