Ahmednagar News : यापूर्वी टोमॅटोचा लाल चिखल पाहिला होता. टोमॅटोचा भाव उतरल्याने ते रस्त्यावर फेकून देण्यात आले होते. पण आता देशभरात लाल टोमॅटोचा भाव ऐकून अनेकांचे चेहरे लाले लाल होत आहेत.
बदलत्या हवामानाचा शेतीव्यवसायाला सवर्क्सधिक फटका बसत आहे. त्यामुळे अनेक वस्तुंचे भाव गगनाला भिडले आहेत. महागाईचा कहर सुरु असतानाच टोमॅटोने देखील या आगीत तेल ओतले आहे.

सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारी लागवडीसाठी शेतकरी शेतीच्या कामात गुंतला आहे, त्यामुळे उन्हाळ्यात लावलेला भाजीपाला पिकाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. अनेक भागात अद्यापही समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे या भागात शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.
तर ज्या भागात पाऊस झाला आहे त्या भागातील शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त झाला आहे. त्यामुळे अनक आठवडे बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी भाजीपाल्यांच्या दरात तेजी आली आहे.
बेमोसमी पावसामुळे परिसरामध्ये विहिरींना मुबलक पाणी असल्याने यंदा उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी भेंडी, गवार, ढोबळी मिरची, वांगे, टोमॅटो, कोबी, मिरची, कारले, दोडके, मेथी, पालक, कोथिंबीर आदी भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती.
यामुळे संपूर्ण उन्हाळ्यामध्ये भाजीपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने भाजीपाल्याचे दर २० ते ३० रुपये किलो प्रमाणे कायम होते. परंतु मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांनी खरीप हंगामाकडे लक्ष केंद्रित केले, त्यामुळे भाजीपाला पिकाकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. आता बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे येथील आठवडे बाजारात भाजीपाल्याचे दर वधारले आहेत.
सध्या शेवगा, कारले, दोडके, टोमॅटो, भेंडी, गवार, चवळी, वांगी, कोबी, फ्लॉवर, ८०रुपये किलो प्रमाणे आहेत. तर मिरची १२० रुपये प्रमाणे आहे. तर मेथी ३० रुपयाला १ तर ५० रुपयांना जुडी मिळत आहे. अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळालेले दर : टोमॅटो ५०००-७०००, वांगी १००० २०००, फ्लावर २५०० ४०००, कोबी १००० – १५००, काकडी १५०० – २०००, गवार ४००० ६०००, घोसाळे २०००-३०००, दोडका ३००० ४५००,
कारले ४००० ५०००, कैरी २५००-४०००, भेंडी ३०००- ३५००, वाल ५०००- ६५००, घेवडा ८०००- १०,०००, बटाटे १४००- १९००, लसूण १००० १६०००, हिरवी मिरची ५०००- ७०००, शेवगा ३००० ५०००, भू. शेंग ४०००-५०००, लिंबू १००० २०००, आद्रक १४००० – १६,५००, गाजर २००० ३०००, दु. भोपळा १०००-१५००, शिमला मिरची ३०००-४०००, मेथी २०००-४०००, कोथिंबीर १००० ३०००, पालक १६०० २०००, शेपू भाजी २००० ४०००, चुका १००० १६००, चवळी २५०० ४०००.
मागील दोन ते तिन लिलावात कांद्याला २००० चा भाव मिळाला. मोठ्या कालावधीनंतर कांद्याला चांगला भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्याने अनेकांनी साठवून ठेवलेला कांदा विक्रीसाठी आनल्याने बाजार समितीत कांद्याची आवक वाढली.
मात्र लगेच कांद्याचे दर कमी होत आहेत, त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे. शनिवारी झालेल्या लिलावात ५७८ ट्रक कांदा म्हणजे १ लाख १५ हजार ७९५ कांदा गोण्यांची आवक झाली होती. यात एक नंबरच्या कांद्याला १५००-१९००, दोन नंबर १०००-१५००, तिन नंबर ६०० १००, चार नंबर २०० ६०० असा भाव मिळाला.