डाळिंबाची लाली ओसरली ; भावात झाली तब्बल पाच हजार रुपयांची घसरण

Published on -

अहिल्यानगर : काल परवा पर्यंत डाळिंबाला १५हजार रुपये प्रति क्विंटल असा चांगला भाव मिळत होते. मात्र आता हे भाव कमी झाले असून ते थेट १०हजारांवर आल्याने तब्बल ५ हजारांची तूट झाली आहे.

अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात मंगळवारी विविध फळांची ३९४ क्विंटल आवक झाली होती. यावेळी डाळिंबांना प्रतिक्विंटल १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. दरम्यान,डाळिंबांच्या भावात पाच हजारांनी घट झाल्याचे झाली. संत्र्यांच्या भावात घट झाली असून संत्र्यांना ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला.

बाजार समितीत डाळिंबांची ६७ क्विंटल आवक झाली होती. डाळिंबांना प्रतिक्विंटल १ हजार ते १० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. मोसंबीची ५५ क्विंटलवर आवक झाली होती. यावेळी मोसंबीला २००० ते ६००० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

सीताफळाची ७ क्विंटलवर आवक झाली होती. सीताफळाला १ हजार ते ५५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पपईची १३ क्विंटलवर आवक झाली होती. पपईला प्रतिक्विंटल १००० ते ३५०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. संत्र्याची ५ क्विंटलवर आवक झाली होती. संत्र्याला ३ हजार ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. सफरचंदाची ५ क्विंटलवर आवक झाली होती.

सफरचंदाला प्रतिक्विंटल ११ हजार ते २० हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. अननसाची ४ क्विंटलवर आवक झाली होती. अननसाला २००० ते ५००० रुपयांपर्यंत भाव मिळाला. पेरूची १०१ क्विंटल आवक झाली होती. पेरूला प्रतिक्विंटल १ हजार ते ४००० रुपये भाव मिळाला. तोतापुरी आंब्यांची २१ क्विंटल आवक झाली होती. तोेतापुरी आंब्यांना प्रतिक्विंटल २००० ते २५०० रुपये भाव मिळाला.

बदाम आंब्यांची १ क्विंटल आवक झाली होती. बदाम आंब्यांना ४००० रुपये भाव मिळाला. निलम आंब्याची ५ क्विंटल आवक झाली होती. निलम आंब्यांना २५०० ते ३००० रुपये भाव मिळाला. ड्रॅगन फ्रूटची ८९ क्विंटल आवक झाली होती. ड्रॅगन फ्रूटला १५०० ते १० हजार रुपये भाव मिळाला. केळीची १४ क्विंटलवर आवक झाली होती. केळीला प्रतिक्विंटल १५०० ते २२०० रुपये भाव मिळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!