टोमॅटोचे भाव कोसळले ! नेपाळ कनेक्शनमुळे टोमॅटो उत्पादक हादरले…

Ahmednagarlive24 office
Updated:

Tomato Price : नेपाळमधून आवक करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय आणि बाजारात वाढलेली स्थानिक आवक यामुळे टोमॅटोचे भाव गेल्या ४ दिवसांत ५० टक्के कोसळले आहेत.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नाशिकच्या लासलगाव प. पू. भगरीबाबा भाजीपाला आवारात काही दिवसांपूर्वी टॉमेटोच्या २० किलोच्या क्रेटला सरासरी २३०० ते २५०० रुपये भाव मिळाला होता. शुक्रवारी हा भाव सरासरी ९०० ते ११०० रुपयांपावेतो घसरला. येत्या काळात दर आणखी कमी होण्याची भीतीमुळे टोमॅटो उत्पादक हादरले आहेत.

काही दिवसांपूर्वी उत्तरेकडील राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोच्या मागणीत अचानक वाढ झाली. पिंपळगाव, नाशिक आणि लासलगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक ५ ते ६ हजार क्रेट्सपर्यंत येत असल्याने आणि प्रतिक्रेट २३०० ते २५०० रुपये इतका बाजारभाव मिळत असल्याने टोमॅटो उत्पादक आनंदात होते.

लासलगाव बाजार समितीत या सप्ताहाच्या प्रारंभी २० किलोच्या क्रेटला जास्तीत जास्त २३०१, तर कमीत कमी ५०० रुपये व सरासरी १८०० रुपये भाव मिळाला. एकीकडे शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत असताना दुसरीकडे किरकोळ बाजारात टोमॅटोचे भाव वाढल्यामुळे केंद्र सरकारने हस्तक्षेप करत नेपाळहून टोमॅटो आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यातच पंजाब, कर्नाटक राज्यांसह नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, नाशिक आणि लासलगाव बाजार समितीमध्ये टोमॅटोची आवक वाढली आहे. या दुहेरी घडामोडींमुळे शुक्रवारी टोमॅटोचे भाव कमालीचे घसरले.

महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीतील टोमॅटोचे दर – 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
11/08/2023
अहमदनगरक्विंटल149200080005000
पुणे-मांजरीक्विंटल434320045003600
चंद्रपूर – गंजवडक्विंटल797350045004000
खेड-चाकणक्विंटल126400070005500
मंचरक्विंटल2100015001250
श्रीरामपूरक्विंटल13150017001600
राहताक्विंटल26200090005500
कल्याणहायब्रीडक्विंटल3100001020010100
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल69600070006500
पुणेलोकलक्विंटल1904300070005000
पुणे- खडकीलोकलक्विंटल2400060005000
पुणे-मोशीलोकलक्विंटल197300070005000
पेनलोकलक्विंटल1149000100009000
वाईलोकलक्विंटल80300090006000
मंगळवेढालोकलक्विंटल41100068004500
कामठीलोकलक्विंटल15600065006300
पनवेलनं. १क्विंटल515650070006750
मुंबईनं. १क्विंटल1395750080007800
रत्नागिरीनं. १क्विंटल20550070006500
सोलापूरवैशालीक्विंटल16250050003000
जळगाववैशालीक्विंटल63500075006000
भुसावळवैशालीक्विंटल4100001200011000
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe