अजित पवारांनी केली मोठी घोषणा; म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- कोरोनाची तिसरी लाट सुरु झाली असून, या लाटेत मोठ्या गतीने संसर्ग वाढत आहे. ५० पेक्षा जास्त लोक असणाऱ्या कार्यक्रमांना मी जाणार नाही,

अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी जाहीर करुन नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री पवार यांनी केले.

बारामती शहरातील विविध विकासकामांची पाहणी करत असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात पवार म्हणाले,

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय. आम्ही विविध विभागांना सांगत होतो, राज्यात दुसरी लाट असताना आम्ही तयारीचे आदेश दिले होते.

ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची तयारी करण्याचं काम सुरू केलेले आहे. दुसऱ्या लाटेत उद्योगाचा ऑक्सिजन इकडे वळवावा लागला.

ज्याची ऑक्सिजन वाढवण्याची क्षमता आहेत, त्यांनी ती वाढवावी. यंदाच्या अधिवेशनात आम्ही ग्रामीण रुग्णालयाला मोठा निधी जाहीर केला आहे.

यामध्ये अनेक ग्रामीण व प्राथमिक रुग्णालये मंजूर करण्यात आली असून, यासाठी चार हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे.

त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाची कामे वेळेत सुरु करण्यासाठी बांधकाम विभाग व संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. सरकार म्हणून आम्ही खबरदारी घेत आहोत.

महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा नियोजनातील २० टक्के खर्चाची मान्यता दिली आहे.

आमदार निधीतून ४ कोटीपैकी १ कोटी निधी आरोग्यासाठी खर्च करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.