अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- नवी दिल्लीतील प्रदूषण वाढल्यानं शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्याची नामुष्की राज्य सरकारवर ओढावली आहे.
पुढील आदेशापर्यंत शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.

नवी दिल्ली आणि एनसीआरमध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रदूषणाचा कहर वाढलेला आहे.
वाढत्या प्रदूषणामुळं मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये म्हणून नवी दिल्लीतील सरकारनं शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान प्रदूषणाच्या मुद्यावरुन आणि अशा परिस्थितीमध्येही शाळा सुरु ठेवल्यावरुन सुप्रीम कोर्टानं केजरीवाल सरकारला फटकारलं होतं.
नवी दिल्लीतील सरकारी कर्मचाऱ्यांना प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास परवानगी देण्यात आली होती.
मग, शाळा का सुरु ठेवण्यात येत आहेत, असा सवाल उपस्थित करण्यात आला होता.
अखेर केजरावील सरकारला सुप्रीम कोर्टानं आज फटकारल्यानंतर शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













