अहमदनगर ब्रेकिंग : भाजप नगरसेवक आणि त्याच्या टोळीवर एक हजार पानांचे दोषारोपपत्र !

Ahmadnagar breaking : राष्ट्रवादी काँग्रेसचे अंकुश दत्तात्रय चत्तर (वय ३५) यांच्यावर हल्ला करून त्यांची हत्या केल्याची धक्कादायक घटना नगर शहरात घडली होती. या घटनेत भाजपचा नगरसेवक अनिल शिंदे आरोपी आहे. हे प्रकरण राज्यभर गाजले होते.

आता या प्रकरणी नगरसेवक स्वप्नील शिंदे आणि त्यांच्या टोळीविरोधात पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी आर. डी. चव्हाण यांच्या न्यायालयात एक हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.

चार अल्पवयीन मुलांसह १२ आरोपींची यात नावे आहेत. यापूर्वी झालेल्या वादातून आणि मुलांमधील भांडणातून अंकुश चत्तर यांची हत्या केल्याचा ठपका शिंदे व त्याच्या टोळीवर ठेवण्यात आला आहे.

या हत्या प्रकरणामध्ये भाजपाचा नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हाद हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुर्‍हे, सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे, मिथुन सुनील धोत्रे, अरूण अशोक पवार, राजु भास्कर फुलारी हे आरोपी तर आहेतच शिवाय चार अल्पवयीन मुलांवर आरोपपत्र दाखल केले गेले आहेत.

सावेडी उपनगरमधील एकवीरा चौकात 15 जुलैच्या रात्रीच्या वेळी शिंदे टोळीने अंकुश चत्तर यांच्यावर लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या आणि वायररोपने हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अंकुश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस तपास करत होते. पोलिसांनी तत्काळ शिंदे व त्यांच्या हल्लेखोरांच्या टोळीला अटक केली. चार मुलांना अटक करण्यात आली.

१५ जुलै रोजी काही मुलांमध्ये भांडण झाल्याची घटना घडली होती. कसून चौकशी केल्यानंतर अंकुश चत्तर आणि स्वप्नील शिंदे यांच्यात जमिनीच्या व्यवहारावरून पूर्वीवाद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून सुमारे एक हजार पानांचे दोषारोपपत्र तयार केले. ते आता न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe