15 November Holiday : बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. आज बँका सुरु राहतील की बंद ? असा प्रश्न विचारला जात होता. खरेतर बँका महिन्यातील दोन शनिवारी बंद ठेवल्या जातात. दुसऱ्या शनिवारी आणि चौथ्या शनिवारी देशभरातील बँकांना सुट्टी असते.
यामुळे 15 नोव्हेंबर रोजी देशातील बँका बंद राहतील का असा सवाल ग्राहकांकडून उपस्थित होत होता. दरम्यान याबाबत आरबीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर डिटेल माहिती देण्यात आली आहे.

15 नोव्हेंबर रोजी शनिवार आहे, पण आज बँका नियमितपणे सुरू राहणार आहेत. देशातील एका महत्त्वाच्या राज्यांमध्ये आज बँकेला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे पण इतर राज्यांमध्ये बँका आज नियमितपणे सुरू राहतील.
आज महिन्याचा तिसरा शनिवार असल्याने बँका बंद राहणार नाहीत. केवळ दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात त्यामुळे आज तिसऱ्या शनिवारी बँका सुरू राहणार आहेत.
अनेकांना शनिवारी बँकांना सुट्टी असते असे वाटते पण प्रत्येक शनिवारी बँका बंद नसतात यामुळे जर तुम्हाला आज बँकेत जायचे असेल तर तुम्ही नक्कीच बँकेत जाऊ शकतात.
कुठे बंद राहणार बँका?
आज फक्त झारखंड राज्यात बँकांना सुट्टी राहणार आहे. झारखंड वगळता देशभरातील बँका आज नियमित कामकाजासाठी खुल्या राहतील आणि ज्या ग्राहकांना शाखेत सेवांची आवश्यकता आहे ते त्यांच्या संबंधित शाखांना भेट देऊ शकतात.
आज 15 नोव्हेंबर रोजी, बिरसा मुंडा जयंती दिन निमित्ताने तसेच झारखंड राज्य स्थापना दिन साजरा करण्यासाठी या राज्यातील सर्व खाजगी, सरकारी आणि सहकारी बँकांना सुट्टी राहणार आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र आज नियमितपणे बँकेचे कामकाज सुरू राहणार आहे.
राज्यातील सर्व बँका आज सुरु राहतील.आरबीआयच्या मते, सर्व अनुसूचित आणि अनुसूचित नसलेल्या बँका प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहतात.
या तारखा सुट्टी म्हणून सूचीबद्ध केल्याशिवाय शाखा पहिल्या, तिसऱ्या आणि काही प्रकरणांमध्ये पाचव्या शनिवारी काम करतात. या महिन्याच्या सुरुवातीला, कन्नड राज्ययोथसव, गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा आणि इतर प्रादेशिक उत्सवांमुळे निवडक राज्यांमध्ये बँका बंद होत्या.
ज्या दिवशी बँका बंद असतात, त्या दिवशी ग्राहक शाखेत न जाताही विविध प्रकारचे आर्थिक आणि गैर-आर्थिक व्यवहार करण्यासाठी मोबाइल बँकिंग आणि नेट बँकिंग सेवा वापरू शकतात.













