अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे.
आता नेवासे तालुक्यातही अनेक रुग्ण सापडले आहेत. सोमवारी तालुक्यातील सलाबतपूर,जळके, गिडेगाव येथील ६० व्यक्तीच्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये सोळा व्यक्ती पॉझिटिव्ह निघाल्याने रुग्णसंख्या वाढली आहे.

नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे मागील दोन दिवसात सात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. या कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कातील साठ व्यक्तींची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली.
यामध्ये सलाबतपूर येथील चौदा,गिडेगाव येथील एक व जळके येथील एक असे सोळा व्यक्ती पॉझिटिव्ह निघाले तर उर्वरित ४४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोरोनाबाधीत सोळा व्यक्तींना उपचारासाठी नेवासा येथील कोविड केअर सेंटरमध्ये नेण्यात आले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com