जयपूर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील बहरोड पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी सहा अज्ञातांनी एके-४७ ने फिल्मी स्टाइल गोळीबार केला. यावेळी ४० वेळा गोळ्या झाडण्यात आल्या असता पोलिसांसोबत चकमकीचा प्रकार घडला आहे.
या हल्ल्यामागून ठाण्यात कैद असलेला कुख्यात गुंड विक्रम गुर्जर ऊर्फ पापला याला पळवून नेण्यात हल्लेखोर यशस्वी ठरले आहे. या आश्चर्यकारक घटनेमुळे संपूर्ण पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहे.

पोलिसांच्या भूमिकेवरही सोशल मीडियात सवाल उपस्थित केला जात आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. त्यासाठी परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. विक्रम गुर्जरला एक दिवस अगोदर पोलिसांनी अटक केली होती.
त्याला लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार होते; परंतु तत्पूर्वीच पोलिसांच्या नाकावर टिच्चून त्याला पळविण्यात आले आहे. दरम्यान, विक्रम गुर्जर हा हरयाणातील मोस्ट वाँटेड गुन्हेगार आहे. त्याच्यावर हत्या, अपहरण आणि खंडणी वसूल करण्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. दुसरीकडे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी वरील घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
- OnePlus 13s बघितला की iPhone विसराल इतकं काही मिळतंय या फोनमध्ये !
- अहिल्यानगर जिल्ह्यात १५ व १६ ते १८ मे रोजी वादळी वारा आणि पाऊस…
- MSRTC News : महाराष्ट्रात येणार एसटीच्या स्मार्ट बसेस ! Pratap Sarnaik यांनी स्पष्टच सांगितलं
- अहिल्यानगरमधील ‘या’ मोठ्या पतसंस्थेकडून ठेवीदारांची लाखोंची फसवणूक ! संचालक मंडळासह १२ जणांवर गुन्हा
- शिर्डी साईबाबा संस्थानच्या कारभारात मोठा बदल ! कारभारासाठी सरकारकडून नवा फॉर्म्युला तयार