Ahmednagar Breaking : ८१ कोटी रुपयांचा अपहार ! पतसंस्थेचा व्यवस्थापक गुंजाळला अटक

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले,

की दूधगंगा पतसंस्थेमध्ये ८१ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे फेर लेखापरीक्षणात स्पष्ट झाल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक यांच्यासह २१ जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच चार जणांना लगेच अटक करण्यात आली होती. सोमवारी सकाळी व्यवस्थापक गुंजाळ याला अटक करण्यात आल्याने अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाच झाली आहे.

उर्वरित १६ आरोपी अद्याप फरार आहे. व्यवस्थापक गुंजाळ स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होणार होते; मात्र सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी निवासस्थानी जाऊन त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान सकाळी दूधगंगा पतसंस्था ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले.

पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळा करणाऱ्यांना त्वरित अटक करून त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात व आमच्या ठेवी परत मिळाव्यात, अशी मागणी ठेवीदारांनी यावेळी केली. याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी ठेवीदारांनी पतसंस्थेच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप करत अध्यक्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी जमवलेल्या मालमत्तेचा पाढाच वाचला. याप्रसंगी ठेविदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe