अहमदनगर ब्रेकिंग : दीड लाखाची लाच मागितल्या प्रकरणी तलाठ्यावर गुन्हा दाखल

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : पोकलेनवर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपयांची मागणी करत तडजोड़ी नंतर दीड लाख रुपये लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर टप्प्या टप्प्याने स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याप्रकरणी पेडगाव येथील महसूल कर्मचारी (तलाठी) आकाश नारायण काशीकेदार याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसारः तक्रारदार यांनी भाडेतत्त्वावर घेतलेले पोकलेन मशिन पेडगाव येथील परिचयाच्या शेतात लावले होते. ११ जुलै रोजी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास पेडगावचे तलाठी आकाश नारायण काशीकेदार

आणि मंडळ अधिकारी डहाळे यांनी पोकलेन तक्रारदार यांना तो पोकलेन वाळू उपसा करण्याकरिता वापरत असल्याचे सांगत पोकलेनवर केस व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करत दुसऱ्या दिवशी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे तक्रारदारांना भेटण्यास बोलावले.

मात्र, तक्रारदार यांनी याबाबत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यानुसार ११ जुलै रोजी पंचांसमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात येऊन पडताळणी दरम्यान तलाठी काशीकेदार यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून

तडजोडीअंती दीड लाख रुपयांची लाच रक्कम टप्या टप्प्याने स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार तलाठी आकाश नारायण काशीकेदार याच्याविरोधात ३१ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आर. बी. आल्हाट, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, हारून शेख, दशरथ लाड यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe