Ahmadnagar Breaking : कर्जत तालुक्यातील माहिजळगाव शिवारात शनिवार, दि.१८ रोजी येथील नगर- सोलापूर महामार्गालगत असलेल्या खेडकर वस्ती, या परिसरातील शेतात अंदाजे ४३ वय असलेल्या एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला.
याबाबतची खबर माहीचे पोलिस पाटील महेश रावसाहेब कदम यांनी मिरजगाव पोलिसांत दिली. घटनास्थळी सहाय्यक फौजदार दत्तात्रय कासार, पोलिस हवालदार बबन दहिफळे यांनी भेट देवून पंचनामा केला.

Ahmadnagar Breaking
नंतर मृतदेह अॅम्बुलन्सने मिरजगाव येथील जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला. पोलिस पाटील महेश कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिरजगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती मिरजगाव पोलिसांकडून देण्यात आली आहे.
याबाबतचा अधिक तपास मिरजगाव पोलिस करत आहेत.