Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात अनके गुन्हेगारी घटनांचा आलेख उंचावत चालला आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. मारहाण, खून आदी घटना ताजा असतानाच आता विवाहितेच्या अपहरणाची धक्कादायक घटना समोर आली आहे.
सहा जणांनी एकट्या राहणाऱ्या विवाहितेस नाजूक कारणातून नगरमधून अपहरण केले. तिला धानोरा (ता. आष्टी, जि. बीड) येथे एक दिवस डांबून ठेवले असल्याची घटना उघडकीस आली आहे.

कालिंदा भाऊसाहेब साबळे (रा. झोपडी कैन्टींग, नगर), मालन बाळासाहेब गायकवाड (रा. सुलेमान देवळा ता. आष्टी, जि. बीड), सुलोचना दत्तात्रय गाडे (रा. दादेगाव ता. आष्टी, जि. बीड), पोपट अबाजी खुडे (रा. केडगाव, नगर),
प्रशांत आबाजी खुडे, भीमराव श्रावण अढागळे (दोघे रा. धानोरा, ता. आष्टी, जि. बीड) अशी आरोपींची नवे असून त्यांच्याविरोधात तोफखाना पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अधिक माहिती अशी : फिर्यादी महिला ही श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील रहिवासी आहेत. त्या सध्या कामानिमित्त सावेडी उपनगरात भाडोत्री बंगल्यात राहतात. त्यांचे पती कामानिमित्त मुंबई येथे व दोन मुली वडिलांकडे आष्टी तालुक्यातील एका गावात असल्याने त्या एकट्याच त्याठिकाणी राहतात.
त्या नगरमध्ये मोलमजुरी करून पोट भारतात. सोमवारी सायंकाळी सहा वाजता वरील आरोपी आले व त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. त्यानंतर रिक्षातून नगर शहरातील चांदणी चौक येथे व तेथून टेम्पोतून धानोरा या ठिकाणी त्यांना घेऊन गेले.
तेथेही त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. त्यानंतर भीमराव अढागळे याच्या घरात फिर्यादीस डांबून ठेवले. दुसऱ्या दिवशी कालींदा साबळे हिने फिर्यादीला घराच्या बाहेर काढले व माळीवाडा बस स्थानकावर आणून सोडले.
फिर्यादीने लगेच तोफखाना पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला असून वरील आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस करत आहेत.