Ahmednagar Breaking : विदयार्थ्यांचा कल, त्यांची आवड व त्यांच्यातील क्षमता ओळखून त्याला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शिक्षक योग्य मार्गदर्शन करू शकतात. स्वत:च्या आयुष्यात नैतिक मूल्याचे आचरण करून समाजासमोर आदर्श मांडणारे शिक्षक एका अर्थाने समाजालाच घडविणारे शिल्पकार टिकवून ठेवण्यास शिक्षकांची भूमिका अत्यंत निर्णायक शिकवण शिक्षक रुजवू शकतो.
मात्र शाळेत उशिरा आलेल्या विद्यार्थिनीला शिक्षकाने केलेल्या शिक्षेमुळे गंभीर जखमी विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विद्यार्थिनीच्या पालकांनी शिक्षकावर आरोप केले असून ४ जुलै रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात जिल्हा परिषदेच्या शिक्षकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेने शिक्षण क्षेत्रात सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत आधीक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथील चारी नं ४५ येथील जिल्हा परिषद शाळेत शिकणारी तृप्ती दीपक भोसले ही विद्यार्थिनी दि. १ /४ /२०१८ रोजी शाळेत उशीरा आल्यामुळे शाळेतील शिक्षक दिगंबर सुनील हांडे यांनी तिला वर्गाबाहेर उभे करून तिच्या छातीत धक्का दिल्यामुळे पाय घसरून ती खाली पडली.
त्यामुळे तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला. त्यामुळे तृप्ती हीच मृत्यू शिक्षकाने केलेल्या शिक्षेमुळे गंभीर जखमी होऊन झाला आहे.
असा तक्रार अर्ज उमा दीपक भोसले यांनी न्यायालयात दाखल केला होता. त्यावर न्यायालयाकडून कोपरगावपोलिसांना याबाबत गुन्हा दाखल करून याबाबत अधिक तपास करून तसा अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यावरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी आज गुन्हा दाखल केला आहे.