Ahmednagar Braking : तालुक्यातील मढी फाटा येथे अवैध वाळु वाहतुकी विरुध्द कारवाई करुन ५ लाख १० हजारांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने नुकताच जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,
देरडे फाटा ते कोळपेवाडी जाणारे रोडने मढी शिवारात जाणाऱ्या रस्त्यावर एक विना नंबरचा निळे रंगाचा ट्रॅक्टर विनापरवाना वाळूने भरून येणार आहे, अशी बातमी मिळाल्याने पोलीस पथकास सदर ठिकाणी जावून खात्री करून कारवाईच्या सुचना दिल्याने पथकाने तात्काळ दोन पंचांसह मढी फाटा, मढी शिवार (ता. कोपरगाव) या ठिकाणी जावुन सापळा रचुन थांबलेले असतांना एक विना नंबरचा पॉवरट्रॅक कंपनीचा ट्रॅक्टर त्यास पाठीमागे निळे रंगाची दुचाकी ट्रॉली येतांना दिसली.
पथकाची खात्री होताच त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा केला असता ट्रैक्टर चालकाने ट्रॅक्टर थांबविला. त्यास पोलीस पथकाची ओळख सांगून ट्रॅक्टरचे ट्रॉलीची पाहणी करता त्यामध्ये वाळू असल्याची खात्री झाल्याने सदर चालकास वाळ वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस केली असता, त्याने त्याच्याकडे शासनाचा वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले.
त्यास त्याचे नाव, गाव विचारले असता त्याने त्याचे नाव तुषार राजेंद्र रोकडे (वय २०, रा. माहेगाव देशमुख, ता. कोपरगाव), असे असल्याचे सांगुन गणेश काटे, विकी सरोदे दोन्ही (रा. कोपरगाव) याच्या सांगण्यावरुन गोदावरी नदीपात्रातुन उत्खनन करून आणलेली असून गणेश काटे व विकी सरोदे हे दोघे वाळू धंद्यामध्ये पार्टनर असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीने अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळू अवैधरित्या चोरी केल्याने ५ लाख १० हजार रुपये किंमतीचा एक निळे रंगाचा पॉवरट्रैक कंपनीचा ट्रॅक्टर त्यास पाठीमागे निळे रंगाची दुचाकी ट्रॉली व एक ब्रास वाळुसह ताब्यात घेवुन त्यांचे विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.