बंद’ होणार देशातील ही मोठी ‘बँक’ तुमचं खातं असेल तर त्वरित करा हे काम 

Ahmednagarlive24
Published:
वृत्तसंस्था :- आदित्य बिर्ला ग्रुपद्वारे सुरु असलेली ऑनलाईन पेमेंट बँक अर्थात आयडिया पेमेंट बँक लवकरच बंद होणार आहे,आदित्य बिर्ला स्वेच्छेने हा व्यवसाय बंद केला आहे.
रिझर्व्ह बँकेने आयडिया पेमेंट बँकेला आपला कारभार संपवण्यासाठीची परवानगी दिली आहे. आयडिया पेमेंट बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आदित्या बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक त्यांचा कारभार बंद करणार आहे.

 

यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच आदित्य बिर्ला आयडिया पेमेंट्स बँकेने आपला कारभार संपवण्याची घोषणा केली होती. काही आकस्मिक घटनांमुळे हा निर्णय घ्यावा लागतो आहे, असं या बँकेनं म्हटलं होतं.

पैश्यासाठी ग्राहकांना करावं लागेल हे काम

 

आदित्य बिर्ला पेमेंट बँके’ने आपल्या ग्राहकांना मेसेजच्या माध्यमातून या बाबतची माहिती दिली आहे. ग्राहकांच्या जमा पैशांचा पुन्हा परतावा करण्यात येईल. ही सेवा बँकेकडून ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येईल. आता बँक आरबीआयच्या नियमांनुसार काम करेल.

 

ग्राहकांना आपले जमा असलेले पैसे परत केले जातील. आदित्य बिर्ला पेमेंट्स बँक आरबीआयद्वारे जारी केलेल्या नियमांनुसार, काम करत राहणार होते.

 

जेणेकरून ज्या ग्राहकांचे पैसे बँकेत आहेत ते पैसे काढू शकतील आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही. बँकेजवळ सध्या जवळपास २० कोटी रुपये कॅश जमा होती. पण अखेर आता पेमेंट बँक आपलं कामकाज बंद करणार आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment