Big Breaking : केंद्राने इथेनॉल निर्मितीवरील निर्बंधामुळे इथेनॉल निर्मिती करणाऱ्या कारखान्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते, हे निर्बंध असेच कायम राहिले तर आर्थिक असंतुलन मोठ्या प्रमाणात वाढेल तेंव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी लावून धरली होती.
त्याचा केंद्र शासनाने शुक्रवारी पुर्नविचार केला असून इथेनॉल निर्मितीचे निर्बंध मागे घेतल्यामुळे हा साखर उद्योगास दिलासा असल्याचे प्रतिपादन बिपीन कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.
याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, थेट उसाचा रस, सिरप, बी हेवी मोलॅसेसपासून ३३ टक्के इथेनॉल निर्मितीचे धोरण पुन्हा कायम केल्याबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,
केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे विशेष कौतुक केले. या निर्णयामुळे साखर कारखानदारीला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
कोल्हे पुढे म्हणाले की, देशातील ग्रामीण अर्थकारणास इथेनॉल निर्मितीतून मोठी चालना मिळाली आहे, चालु वर्षी उसाचा तुटवडा असल्याने केंद्र शासनाने इथेनॉल निर्मीतीवर बंधने घातली होती. ती साखर उद्योगास मारक असून देशात सुमारे ३५५ कारखान्यानी इथेनॉल निर्मीती सुरू केली.
राज्यात यासाठी १५५ कारखान्यांनी सुमारे ८ हजार कोटी रूपयांची गुंतवणुक केली. गेल्या वर्षी १२० कोटी लिटर इथेनॉल ऑईल कंपन्यांना पुरवले गेले. चालु वर्षी ३०० कोटी लिटर्स पर्यंत वाढ झाली. त्यातच केंद्राने आणलेले निबंध यामुळे इथेनॉल निर्मीती करणाऱ्या कारखान्यांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले होते.
केंद्र शासनाने नुकताच पुर्नविचार करत हा साखर उद्योगास दिलासा आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याने देशात सर्वप्रथम गेल्या ४ ते ५ वर्षापासून थेट उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीत आघाडी घेतली आहे.
माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारात देश पातळीवर साखर उद्योगात सातत्याने नाविन्यपूर्ण प्रयोग करत सहकार जपवणुकीसाठी विशेष परिश्रम घेतले आहे. ग्रामीण अर्थकारणात साखर उद्योगाचे विशेष योगदान आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम देण्यासाठी इथेनॉल निर्मीतीचा मोठा फायदा होत आहे, असे ते शेवटी म्हणाले.
बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत साखर उद्योगात आर्थिक स्थैर्यता आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षात धडाडीचे पावले उचलत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करत इथेनॉल निर्मीतीचा पुर्नविचार करुन त्याबाबत ठोस निर्णय घेतला त्याबद्दल युवानेते, कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनीही केंद्र शासनाचे आभार मानले.