Ahilyanagar Breaking News : ट्रकचालकाचा गळा कापून ट्रक लुटण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांचा हा प्रयत्न फसला. ही घटना नारायणडोह परिसरात (ता.अहिल्यानगर)येथे घडला आहे. दरम्यान सदरचा ट्रक पळून नेणारे दोघे आरोपी तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना वाळूंज बायपास नारायणडोह परिसरात मंगळवारी घडली.
उस्वाल इम्प्रियल चव्हाण, साहेबा आनंदा गायकवाड असे ताब्यात घेतलेल्या संशोध आरोपीचे नाव आहे. तर अनोक सिंह असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-11-at-9.56.39-PM.jpeg)
याबाबत माहिती अशी की, राजस्थान येथील मालवाहतूक ट्रक घेऊन वाळून बायपास नारायणोहो येथून जात असताना दोन व्यक्तींनी ट्रक लुटण्याच्या उद्देशाने ट्रक चालकावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात ट्रक चालक गंभीर जखमी झाले.
त्यानंतर दोघ संशितांनी ट्रक पळवीत असताना महावितरणच्या खांबांना धडक दिली. त्यानंतर मोठा आवाज झाल्याने परिसरात असलेल्या ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर दोघे संशयित हे पळून जाण्याच्या उद्देशाने रेल्वे ट्रॅकने पळाले असता पोलिसांनी पाटलाग करून दोघांना ताब्यात घेतले. याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.