राज्य सरकारने नुकतीच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या असून मंगळवारी नऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या बदलण्यात आल्या आहेत. यामध्ये अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची बदली करण्यात आली असून त्यांना साखर आयुक्त म्हणून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या जागी नव्या जिल्हाधिकाऱ्यांची अद्याप नियुक्ती झालेली नाही.
सिद्धराम सालीमठ यांचे योगदान
सिद्धराम सालीमठ यांनी दोन वर्षे अहिल्यानगर जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. या काळात त्यांनी जिल्ह्यात अनेक नव्या योजना आणि उपक्रम राबवले, ज्यामुळे प्रशासन अधिक प्रभावी बनले.

इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या:
🔹 राजेश देशमुख – कोकण विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले राजेश देशमुख यांची बदली मुंबई येथे झाली असून ते आता राज्य उत्पादन शुल्क आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळतील.
🔹 नयना गुंडे – नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तपदावरून त्यांची पुण्यात महिला आणि बालकल्याण आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
🔹 विमला आर. – त्या याआधी मुंबईत समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालक होत्या, आता त्यांची नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आणि सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
🔹 मिलिंदकुमार साळवे – भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे.
🔹 डॉ. सचिन ओंबासे – धाराशिव जिल्हाधिकारी पदावरून त्यांची बदली सोलापूर महानगरपालिका आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
🔹 नाशिक आदिवासी विकास आयुक्त – महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे नाशिक आयुक्त, त्यांची नाशिकमध्येच आदिवासी विकास आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
🔹 राहुल कुमार मीना – गडचिरोलीचे सहायक जिल्हाधिकारी होते, त्यांची लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.