Ahilyanagar News : मोठी योजना, कोकणातील नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणार ! अहिल्यानगर-नाशिक-मराठवाड्याचा दुष्काळ संपणार

Published on -

Ahilyanagar News : पावसाचे कमी अधिक प्रमाण, समन्यायी धोरणामुळे मराठवाड्याला नाशिक नगरमधील सुटणारे पाणी, पावसाची अनियमितता यामुळे नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यावर नेहमीच दुष्काळाची टांगती तलवार उभी असते. त्यातच या भागात अर्थात नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा या भागात बारमाही पाणी असणाऱ्या नद्या नाही म्हटलं तरी वावगं ठरणारं नाही. त्यामुळे उन्हाळ्यातील दुष्काळ हा ठरलेलाच. परंतु आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून आणि राज्य सरकारच्या महत्वपूर्ण निर्णयातून आता अहिल्यानगर, नाशिक, मराठवाड्याचा दुष्काळी मिटेल असे चित्र आता निर्माण झाले आहे.

त्याचेही कारण असे की, कोकण वाहीनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी अर्थसंकल्पात प्राधान्य देण्यात आले आहे. मराठवाड्यातील २ लाख ४० हजार हेक्टर क्षेत्राला पाणी उपलब्ध करण्यास महायुती सरकारचे प्राधान्य असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.विखे पाटील हे कोकण वाहिनी नद्यांच्या पाण्याबाबत फार पूर्वी पासून आग्रही आहेत. आता त्यांच्या या प्रयत्नाना यश येताना दिसत आहे. आता या प्रकल्पाचा विचार केला तर नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा आणि उल्हास या नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याची योजना असल्याची माहिती समजली आहे.

प्रस्तावित मार्गानुसार, हे पाणी नाशिक जिल्ह्यातील वाघाड, करंजवण, भंडारदरा, मुळा, कडवा, मुखणे आणि भावली या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वळवले जाईल. त्यानंतर, हे पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणापर्यंत पोहोचवण्याची योजना आहे. या प्रकल्पामुळे नाशिक, अहिल्यानगर, आणि मराठवाड्यातील दुष्काळप्रवण भागांना पाण्याचा लाभ होण्याची माहिती समजली आहे. यामुळे सामान्यायीचा तिढा देखील सुटेल. असे जर झाले तर नाशिक, अहिल्यानगर, आणि मराठवाड्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होणार आहे. आता यात आणखी शासकीय, प्रशासकीय स्तरावर आणखी काही बदल देखील होऊ शकतात. अर्थसंकल्पामध्ये गोदावरी पुनर्भरण आणि मराठवाडा ग्रीडसाठी केलेल्या अर्थिक तरतुदी मुळे महाराष्ट्र दुष्काळमुक्त होईल अशी ग्वाही मंत्री विखे यांनी दिलीये.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News