Ahmadnagar Breaking : अकोले तालुक्यातील कोतूळ येथील रहिवासी असलेले शांताराम भाऊसाहेब देशमुख (वय ५५) हे गेल्या महिना भरापासून बेपत्ता होते.
एक महिन्यानंतर काल शनिवारी दुपारी त्यांचा मृतदेह कोतूळ येथे मुळा नदी पात्रात पाण्यावर तरंगलेलल्या अवस्थेत आढळून आला. अकोले पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की कोतुळ येथून दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजता घरातून काहीही न सांगता देशमुख निघून गेले होते.
मुलगा राजेंद्र शांताराम देशमुख याने दिलेल्या खबरीवरून अकोले पोलिसांनी बेपत्ता असल्याची नोंद केली होती.
एक महिन्यानंतर मुळा नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळला आहे. सायंकाळी कोतुळ येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कर करण्यात आले.