अहमदनगर ब्रेकिंग : एकाच जमिनीची दोन वेळा विक्री !

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : विक्री केलेल्या जमिनीची तलाठी दप्तरी नोंद न करता तलाठ्याला हाताशी धरून बोगस ७ /१२ उतारे तयार करत जमिनीची दुसऱ्यांदा विक्री केल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आबासाहेब रामदास गोंटे (रा. शिरसगाव बोडखा, ता. श्रीगोंदा) याच्याविरोधात बबन धोंडिबा चव्हाण रा. नागपुरचाळ, एअरपोर्ट रोड येरवडा, यांच्या फिर्यादीवरून जमीन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसारः आरोपी याने फिर्यादी यांना शिरसगाव बोडखा शिवारातील गट नं. १८७ / १ मधील २१ गुंठे जमीन दि. २७ ऑगस्ट रोजी दुय्यम निबंधक कार्यालय, श्रीगोंदा या ठिकाणी दस्त नोंदणी करत विक्री केली होती.

विक्री नंतर आरोपी याने फिर्यादी यांचा विश्वास संपादित करत विक्री केलेल्या जमिनीची तलाठी दफ्तरी नोंद करून देणार असल्याचे सांगत कामगार तलाठी यांना हाताशी धरत

प्रत्यक्ष खरेदी विक्रीची नोंद न करता जमीन नोंदीचे बोगस कागद तयार करत खोटे ७/१२ उतारे तयार करून देत याच क्षेत्राची दि. २७ सप्टेंबर २०२२ रोजी घोटवी येथील सुरेश भाऊ निंभोरे यांना दुय्यम निबंधक कार्यालय, श्रीगोंदा येथे विक्री करत फिर्यादी यांची फसवणूक केली.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिवाणी न्यायालय, श्रीगोंदा येथे क्रि.चौ. अर्ज नं- ४०८ / २०२२ अन्वये अर्ज केल्याने न्यायालयाने जा. क्र. १५०४/२०२३ दि. १२ मे २०२३ अन्वये सीआरपीसी क १५६ / ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जमीन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास श्रीगोंदा पोलिस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe