अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- ट्रक-टेम्पोची समोरासमोर धडक होऊन टेम्पो चालक गोरख सुभाष अडसुळ (वय 27 रा. कुरकुंभ ता. दौंड जि. पुणे) हे जखमी झाले आहेत.
अहमदनगर-दौंड रोडवरील हिवरे झरे (ता. नगर) शिवारात हा अपघात झाला. याप्रकरणी ट्रकवरील अज्ञात चालकाविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी टेम्पो चालक अडसुळ यांनी फिर्याद दिली आहे. गोरख अडसुळ हे त्यांचा टेम्पो नगर-दौंड रोडने नगरकडून कुरकुंभकडे घेवुन जात
असताना दौंड बाजूकडून येणार्या ट्रक चालकाने अडसुळ यांच्या टेम्पोला हिवरे झरे शिवारात समोरून धडक दिली. या धडकेत चालक अडसुळ जखमी झाले आहेत.
ट्रक चालक अपघातस्थळावरून पसार झाला. टेम्पोचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक गव्हाणे करीत आहेत.