अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- अज्ञात वाहन चालकाने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरूण साकिब हुसेन ऊर्फ बबलु सय्यद (वय 26 रा. भातोडी पारगाव ता. नगर) याचा मृत्यू झाला.
जामखेड रोडवरील आर्मीचे बंद थेटरजवळ हा अपघात झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत साकिबचा भाऊ शकील हुसेन ऊर्फ बबलु सय्यद (वय 29) यांनी फिर्याद दिली आहे. साकिब हुसेन ऊर्फ बबलु सय्यद हा त्याच्याकडील दुचाकीवरून जामखेड रोडने जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या वाहन चालकाने धडक दिली.
या धडकेत जखमी झालेल्या साकिबचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक घटनास्थळावरून वाहन घेऊन पसार झाला. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार नागरगोजे करीत आहेत.