अहमदनगर ब्रेकींग: म्हणून ‘या’ तीन अधिकार्‍यांना एसीबीकडून अटक

Published on -

AhmednagarLive24 : अहमदनगरच्या लाचलुचपत (एसीबी) विभागाने अहमदनगर वनविभागाच्या तीन अधिकार्‍यांना आज अटक केली आहे.

सन 2015-16 या आर्थिक वर्षात कर्जत तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडेकर यांनी सांगितले.

वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर वृषीकेत पाटील, वनरक्षक बलभीम राजाराम गांगर्डे व वनरक्षक शेखर रमेश पाटोळे यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून या दोन्ही गुन्ह्यात पाच आरोपी आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe