अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून बाधितांची आकडेवारीमध्ये वाढ होतच आहे.
याला रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच यामध्ये दरदिवशी काहीतरी नवीन नियम करण्यात येत आहेत.
नुकतेच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश काढला आहे. करोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत.
गर्दी टाळण्यासाठी नगर जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती 18 हे रोजी मध्यरात्री पासून 31 मे अखेर पूर्ण बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी या आदेशावर शिक्कामोर्तब केले आहे.
पहा व्हिडीओ –
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम