अहमदनगर ब्रेकींग: सत्तूरने वार करत युवकाला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- मागील भांडणाच्या कारणातून युवकावर सत्तूरने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना बारादरी (ता. नगर) शिवारातील चांदबीबी महाल रस्त्यावर घडली.(Ahmednagar Breaking)

या हल्ल्यात युवक जखमी झाला आहे. फैयाज अक्तार शेख (वय 24 रा. खाटीकगल्ली, आशा टॉकीजमागे अ.नगर) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याच्यावर अहमदनगर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्याने नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून अरबाज शकील सय्यद, शकील उर्फ गुलु सय्यद (पुर्ण नाव माहीत नाही), आदम बाबा बागवान (सर्व रा. नालेगाव अहमदनगर) यांच्या विरोधात खूनाचा प्रयत्न कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी शेख आणि आरोपी यांचे यापूर्वी भांडण झाले होते. या कारणातून आरोपी यांनी फिर्यादीच्या मानेवर सत्तूरने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करत असताना तेव्हा फिर्यादीने डावा हात मध्ये घातला.

यामुळे फिर्यादीचे डावे हाताचे अंगठ्या जवळील बोटाला मार लागला व रक्तस्राव होऊन फिर्यादी गंभीर जखमी झाले. फिर्यादीचे मित्र आमिर मध्ये आला असता त्याला आदम बाबा बागवान याने लाकडी दंडक्याने मारहाण केली.

बागवान याने फिर्यादीस पण पाठीवर काठी मारली. फैयाज तुला सोडणार नाही, किती पण आमचे वर केसेस कर असे म्हणत फिर्यादीस व त्याचे मित्रास लथाबुक्क्यांनी मारहाण करत दमबाजी केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe