अहमदनगर ब्रेकिंग : डॉकटरांचा मृतदेह आढळला ! परिसरात शोककळा…

अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2022 :-  राहुरी तालुक्यातील उंबरे येथील डॉ. सतीश लक्ष्मण दुशिंग (वय 44) यांचा राहुरी तालुक्यातील सडे येथे रेल्वे भुयारीमार्गालगत मृतदेह आढळून आल्याने त्यांचा अपघात झाल्याची चर्चा सध्या परिसरात सुरु आहे.

डॉ. दुशिंग हे उंबरे येथे वैद्यकीय क्षेत्रात काम करत होते. रविवारी रात्रीच्या वेळी ते आपल्या शेतामध्ये ट्रॅक्टर चालकासाठी डबा घेऊन गेले होते.

परंतु सकाळ होऊनही ते घरी न परतल्याने त्यांची सर्वत्र शोधाशोध सुरू झाली.

अखेर त्यांचा मृतदेह सकाळी सडे हद्दीत असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाजवळ आढळून आला.

या घटनेमुळे या परिसरात खळबळ उडाली. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

अपघातामध्ये त्यांचा मृत्यू झाला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला. त्यांच्या डोक्याला मार होता. या घटनेनंतर उंबरे परिसरात शोककळा पसरली आहे.