अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2021 :- चार चोरट्यांनी धाडसी चोरी करत कटावणीच्या सहाय्याने दरवाजा तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख 79 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला.
वाळूंज (ता. नगर) शिवारात काल रात्री दोन वाजता ही घटना घडली. बन्सी लक्ष्मण ठाणगे (वय 60 रा. हिवरे बाजार हल्ली रा. वाळुंज) यांच्या घरावर चार चोरट्यांनी रात्री दोन वाजता हल्ला चढविला.
घराचा दरवाजा कटावणीच्या सहाय्याने उचकटविला. घरातील 50 हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एक लाख 79 हजार 500 रुपये किंमतीचे ऐवज लुटला.
चोरटे घरात घुसल्याचे ठाणगे कुटुंबाच्या लक्षात येताच त्यांनी प्रतिकार केला. चोरटे आणि फिर्यादीमध्ये झटापट झाली आहे. यामध्ये फिर्यादी जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक बोराडे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम