अहमदनगर ब्रेकिंग : अपघातात माजी सरपंच महिलेचा मृत्यू !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  मांजरी रोडवरील रेल्वे स्टेशन येथे ट्रॅक्टर आणि मोटरसायकलच्या अपघातात तांदुळवाडी येथील माजी सरपंच बेबीताई सुर्यभान म्हसे (वय ५८) या झाल्याची घटना घडली आहे.

उसाचा भरलेला ट्रॅक्टर शनिवारी दुपारच्या वेळी राहुरीच्या दिशेने चालला असता तांदुळवाडी येथील माजी सरपंच बेबीताई म्हसे नातवासोबत मोटारसायकलवर घराकडे जात असताना

रेल्वे गेटच्या वळणावर मोटारसायकलचा तोल जाऊन खाली पडल्या.

त्यांच्या अंगावरुन ट्रॅक्टरचे चाक गेल्याने माजी सरपंच म्हसे गँभीर जखमी झाल्या.

त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र त्यांचा मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe