अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचे दागिने चोरणारा गजाआड

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : महिलेचे सोन्याचे दागिने चोरणारा गजाआड करण्यात आला आहे. मुसा अन्नू सय्यद उर्फ इराणी (वय ३०, रा. अंबिवली, कल्याण, जि. ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीविरुद्ध मोक्का, जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, सरकारी कामात अडथळा आणणे अशा प्रकारचे १४ गुन्हे दाखल आहेत.

१ डिसेंबर २०२३ रोजी फिर्यादी शारदा रघुनाथ गाजुल (वय ६७, रा. जाधव मळा, बालिकाश्रम रोड) या रोडने त्यांच्या घरी जात असताना दोन अज्ञात इसम मोटारसायकलवर आले. त्यांनी गाजुल यांच्या गळ्यातील १ लाख ५ हजार रुपये किंमतीचे अडीच तोळे वजनाची चेन तोडून पोबारा केला.

या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास एलसीबीच्या पथकाने वेगाने फिरवला. मुसा अन्नू सय्यद उर्फ इराणी याच्याकडे संशयाची सुई गेली.

सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा सुगावा लागल्याने पोलिस पथकाने कल्याण गाठले. तेथे आरोपीस जेरबंद केले. आरोपीने अज्जू (पूर्ण नाव माहित नाही) याच्या मदतीने गुन्हा गेल्याचे सांगितले.

चोरीस गेलेला माल आरोपीने त्याची आई व बहिण यांच्यामार्फत विक्री केला असल्याचे सांगितले. आरोपीकडून ९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, पोलिस उपनिरीक्षक तुषार धाकराव,

पोहेकॉ. सुनील चव्हाण, संदीप पवार, दत्तात्रय गव्हाणे, रविंद्र कर्डिले, संतोष लोंढे, पोकॉ. अमृत आढाव यांच्या पथकाने ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe