अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने घेतला गळफास

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने, तसेच आई-वडिलांना खर्चासाठी ३० हजार रुपयांची मागणी करत असल्याने पतीने आत्महत्या केली.

हा प्रकार शनिवारी रात्री सात ते रविवारी सकाळी ७ वाजेच्या कालावधीत नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथे घडला. गोपीचंद रोहिदास भोसले (३०, रा. पिंपळगाव कौडा, ता. नगर) असे गळफास घेतलेल्या पतीचे नाव आहे.

याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गोपीचंद याची आई कमल रोहिदास भोराले यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार गोपीचंद याचे काही वर्षांपूर्वी श्रृती कैलास चव्हाण (रा. वडारवाडी, भिंगार, ता. नगर) हिच्याशी लग्न झाले होते.

परंतु, लग्नानंतर तिचे गोपीचंद याच्याशी वेळोवेळी भांडण झाले. भांडण झाल्यानंतर ती तिच्या माहेरी वडारवाडी, भिंगार येथे निघून जात असे. काही दिवसांपूर्वी असेच भांडण करुन ती माहेरी गेलेली होती. गोपीचंद याने तिला परत नांदायला येण्याचा आग्रह धरला होता.

परंतु, सासरी येण्याच्या मोबदल्यात श्रृती तिच्या आई वडिलांना खर्चासाठी ३० हजार रुपयांची मागणी करत होती. त्यामुळेे तिच्या त्रासाला कंटाळून गोपीचंद याने राहत्या घरात छपराला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांनी या फिर्यादीवरून श्रृती हिच्याविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेद्र सानप यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी भेट दिली व पंचनामा केला.

त्यांच्यासोबत फौजदार चव्हाण आणि महिला पोलिस कर्मचारी गायकवाड होत्या. या गुन्हयाचा तपास सहायक निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार चव्हाण हे करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe