Ahmednagar breaking : भारतीय लष्करी सेवेत पाथर्डी तालुक्यातील अनेक तरुण भारतीय लष्करी सेवेमध्ये सेवा बजावीत आहे. मोठी लष्करी परंपरेची सेवा अगदी ब्रिटिश काळापासून या पाथर्डी तालुक्यामध्ये आहे. कारगिलमध्ये देखील तालुक्यातील अनेक जवानांनी मोठी कामगिरी बजावलेली आहे. काहीजण शहीद देखील झाले होते.
पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथील मराठा बटालियन १५ मध्ये भारतीय लष्करामध्ये सेवेत कार्यरत असलेला जवान कै. ज्ञानेश्वर कचरू सानप एक उत्कृष्ट जवान म्हणून त्यांची सुमारे १२ ते १३ वर्ष सेवा झाली होती.
सेवेमध्ये असतानाच त्यांना काही शारीरिक व्याधींना सामोर जावे लागले आणि उपचार सुरू असतानाच दुर्दैवाने ते शहीद झालेले आहे. आज संपूर्ण लष्करी इतमामात शिरसाटवाडी येथे त्यांचा अंत्यविधी केला.
अत्यंत भारावलेल्या वातावरणामध्ये लष्कराच्या जवानांनी त्यांना सलामी देऊन त्यांना अखेरचा निरोप दिला. ग्रामस्थांच्या नागरिकांच्या वतीने कै. ज्ञानेश्वर सानप यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
प्रताप काका ढाकणे तसेच इतर सामाजिक कार्यकर्ते, तरुण मित्र व ग्रामस्थ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आपले मत व्यक्त केले.