अहमदनगर Live24 टीम, 29 डिसेंबर 2021 :- विवाहितेचे इंस्टाग्रामवर बनावट खाते उघडून त्यावर तिचे फोटो टाकणार्या अज्ञात तरूणासह त्याला मदत करणार्या अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात येथील कोतवाली पोलीस ठाण्यात भादंवि कलम 354 (ड), सह 43, 66 (क), 66 (ड) महिती तंत्रज्ञान अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ahmednagar Breaking)
केडगाव उपनगरात राहणार्या विवाहितेने फिर्याद दिली आहे. फिर्यादी विवाहिता यांचे सोशल मिडीयावर फक्त व्हाट्सअप खाते आहे. त्या त्याचा वापर गरजेनुसार करतात.

त्यांचे इंस्टाग्रामवर खाते असल्याची माहिती त्यांच्या भावाने त्यांना दिली. यावर त्यांनी खात्री केली असता सदरच्या खात्यावर फिर्यादी यांचे फोटो दिसले.
त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाणे गाठून याबाबत पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी अज्ञात व्यक्ती व त्याला मदत करणार्या अन्य अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम