अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- कुख्यात गुन्हेगार रामसिंग त्रिंबक भोसले (वय 30 रा. सलाबतपुर ता. नेवासा) व त्याच्या टोळीतील इतर 10 सदस्यांवर संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे.(Ahmednagar Police)
जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जे. शेखर पाटील यांनी मान्यता दिली आहे.
मोक्का कायद्यान्वये करण्यात आलेल्या कारवाईमध्ये भोसले याच्यासह अजय अशोक मांडवे (वय 22), प्रद्युम सुरेश भोसले (वय 19), सचिन सुरेश भोसले,
आसिफ नसिर शेख, डिच्चन त्रिंबक भोसले (सर्व रा. सलबतपुर ता. नेवासा), समीर ऊर्फ चिंग्या राजु सय्यद (वय 21 रा. नेवासा फाटा), बाळासाहेब ऊर्फ बयंग सुदमल काळे (वय 34 रा. गेवराई ता. नेवासा), बाबाखान शिवाजी भोसले,
सुनील बाबाखाना भोसले (दोघे रा. गोंडेगाव ता. नेवासा), रकुल दशरथ चव्हाण यांचा समावेश आहे. 24 सप्टेंबर 2021 रोजी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोड्याचा गुन्हा घडला होता.
सदरचा गुन्हा भोसले टोळीने केल्याचे पोलीस तपासात समोर आले. या गुन्ह्यासह सुमारे 20 गंभीर गुन्हे भोसले टोळीने केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले.
यानंतर भोसले टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाई करावी, असा प्रस्ताव नाशिकला पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला पोलीस उपमहानिरीक्षक यांनी मंजूरी दिली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम