अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- वाळू तस्करीतून शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथे भर सकाळी 10 वाजता घडली. दोन दुचाकीवरून बाहेरुन आलेल्या चौघांनी भर चौकातच गावातील तरुणांवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे.(Ahmednagar Breaking:)
या घटनेने पुन्हा एकदा शेवगाव तालुक्यातील वाळू तस्करीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या गोळीबाराने पोकॉ. दीपक कोलते हत्या प्रकरणाची आठवण झाल्या शिवाय राहात नाही.
शेवगाव तालुक्याच्या हद्दीवरून गोदावरी नदी वाहते. या नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा चोरीछुपा सुरू असतो. या वाळूच्या तस्करीतून अनेकवेळा दोन गटात मारामार्या, जाळपोळ व खुनासारख्या घटना घडल्याने शेवगाव तालुक्यासह जिल्ह्याने अनुभवल्या आहेत.
त्यातच आज शनिवारी सकाळी 10 वाजता चापडगाव येथे बाहेर गावाहुन दोन दुचाकीवर चौघे तरुण आले होते. भर चौकातच गावातील एका तरुणांवर यातील एकाने गावठी कट्ट्यातून गोळीबार केला.
ही गोळी चापडगाव येथील तरुणाच्या हाताला चाटून गेली. तर त्या तरुणांनी हवेत गोळीबार करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने चापडगावसह शेवगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम