अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ नदीत आढळला अनोळखी पुरूषाचा मृतदेह

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :-  नालेगाव परिसरातील सीना नदीच्या नाल्यामध्ये अंदाजे 35 ते 40 वर्ष वय असलेल्या पुरूषाचा मृतदेह आढळून आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान कोतवाली पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला हे समोर येणार आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेहाची ओळख पटवून तपास करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पुरूषाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती स्थानिकांनी कोतवाली पोलिसांना दिली.

अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, शहर उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवालीचे निरीक्षक संपत शिंदे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

या मृतदेहाच्या अंगावर पांढरे कपडे व जिन्स पॅन्ट असून त्याचे अंदाजे वय 35 ते 40 वर्ष आहे. पोलिसांनी त्याचा मृतदेह बाहेर काढून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केला. मृतदेहाची ओळख पटलेली नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe