अहमदनगर ब्रेकिंग : एक कोटींच्या गुटख्यात ‘या’ दोघांची नावे निष्पन्न !

Published on -

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :-  कोतवाली पोलिसांनी बोल्हेगाव परिसरात पकडलेल्या एक कोटींच्या गुटख्याप्रकरणी मुंबईत येथील दोघांची नावे समोर आली आहे.

यामुळे नगरच्या गुटख्याचे मुंबई कनेक्शन समोर आले आहे. तपासादरम्यान मुंबई येथील पवन ऊर्फ राहुल ऊर्फ ठाकूरजी ऊर्फ श्रीकांत सिंग व नकुल पंडित ऊर्फ सतीष साळवी (रा. मुंबई) यांची नावे समोर आली आहे.

ते दोघे पसार झाले आहे. कोतवालीचे पथक त्यांच्यासाठी मुंबई येथे जावून आले, पण ते मिळून आले नाही. कोतवाली पोलिसांनी त्यांच्या हद्दीत दुचाकीवरून गुटखा वाहतूक करणार्‍या दोघांना पकडले होते.

त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कोतवाली पोलिसांनी तोफखाना पोलीस ठाणे हद्दीतील बोल्हेगाव परिसरात एका शेतामध्ये छापा टाकला.

या शेतामधील एका गोडाऊनमध्ये तीन ट्रक गुटखा मिळाला. त्याची मोजदाद केली असता तो एक कोटी एक लाख 56 हजार 720 रूपये किंमतीचा असल्याचे समोर आले.

याप्रकरणी 11 जणांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत 10 जणांना अटक केली होती. या सर्व आरोपींना 22 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.

त्यांना मंगळवार, 22 फेब्रुवारीला न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत आहे.

अटक केलेल्या 10 आरोपींकडील माहितीवरून या गुटख्यासंंदर्भात मुंबई येथील सिंग व साळवी या दोघांचा सहभाग निष्पन्न झाला आहे.

नगरमध्ये येणार्‍या गुटख्याचे कनेक्शन मुंबईत निघाले आहे. नेमका हा गुटखा मुंबई येथून नगरमध्ये येत होता का? याचा शोध कोतवाली पोलिसांकडून घेतला जात आहे.

मुंबई येथील सिंग व साळवे यांना अटक केल्यानंतरच गुटख्याविषयी आधिक माहिती समोर येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe