अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2022 Ahmednagarlive24:- अलीकडच्या काळात सोशल मीडियावर महिला, मुली यांच्या नावे बनावट अकाऊंट उघडून बदनामी होत असलेल्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना पुन्हा समोर आली आहे.
ब्युटी पार्लरचा व्यवसाय करणार्या महिलेच्या नावे इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून बदनामी केली. याप्रकरणी पारनेर तालुक्यातील महिलेने येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 7447241925 मोबाईल नंबर धारक व्यक्तीविरूध्द भादंवि कलम 500 सह आयटी अॅक्ट कलम 66 (सी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
23 जानेवारी 2022 रोजीच्या पूर्वी ही घटना घडली असून गुरूवार, 3 मार्च 2022 रोजी हा गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या नावाचा व फोटोचा वापर करून इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार केले.
सदर अकाऊंटवरून फिर्यादीच्या मैत्रिणीला मेसेज करून फिर्यादीची बदनामी केली. हा प्रकार 23 जानेवारी 2022 रोजीच्या पूर्वी घडला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
आपल्या नावे बनावट अकाऊंट असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे करीत आहेत.