अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :- घराबाहेर फोनवर बोलत उभ्या असलेल्या महिलेला शिवीगाळ करत तिच्याशी गैरवर्तन करणार्या तरूणाविरूद्ध येथील तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जय खरात (रा. बिशप लॉयर्ड कॉलनी, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.

सावेडी उपनगरात मंगळवारी दुपारी ही घटना घडली. फिर्यादी महिला मंगळवारी दुपारी त्यांच्या घराच्या बाहेर उभ्या राहून फोनवर बोलत होत्या.
त्यावेळी जय खरात तेथे आला. त्याने फिर्यादी यांचा हात धरून, तू माझ्यासोबत चल, असे म्हणून गैरवर्तन केले. शिवीगाळ करत घराच्या बाहेरील खुर्चीची तोडफोड केली.
फिर्यादी यांच्या मुलास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या मुलीला फोन करून वाईट बोलला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी, उपनिरीक्षक समाधान सोळुंके यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस नाईक जावेद शेख करीत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम