अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड अडचणीत येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात मधुकर पिचड आणि कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सुनेने पिचड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार करत फिर्यादी सुनेनं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांकडे पोलीस सुरक्षा मागितली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मधुकर पिचड महत्वाच्या पदांपासून दूर आहेत.
अशावेळी आता पिचड यांच्याविरोधात त्यांच्या सुनेने गंभीर आरोप केले आहेत. मुलाला आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि सुनेला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पिचड यांच्यावर करण्यात आला आहे.
पिचड यांच्या सुनेने आता पंचवटी पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. कलम 498, 306, 406, 324, 504, 506, 468, 471 अन्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम