अहमदनगर ब्रेकिंग : आज मध्यरात्रीपासून जिल्ह्यात हे निर्बंध लागू !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 10 जानेवारी 2022 :-  रात्री 11 ते सकाळी 5 पर्यंत राज्यात सर्वत्र संचारबंदी तर रात्री नाईट कर्फ्यू घोषीत करण्यात आला आहे. राज्यात आता दिवसा जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसा पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही.

अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास निर्बंध सरकारी कार्यालयात भेटणाऱ्यांना निषेध, आवश्यकता असल्यासच मुख्य कार्यालयाची लेखी परवानगी आवश्यक प्रायव्हेट ऑफिसेसमध्ये वर्क फ्रॉम होम,

50 टक्के पेक्षा अधिक जणांना परवानगी नाही लग्न समारंभासाठी 50 जणांना परवानगी अंत्यविधी आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी सामाजिक,

धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमासाठी 50 जणांना परवानगी 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि कॉलेज बंद स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर, ब्युटी पार्लर बंद हेअर कटिंगची दुकानं 50 टक्के क्षमतेने सुरू,

रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार पर्यटन स्थळं बंद, पार्क, प्राणी संग्रहालय, फोर्ट, म्युझियम, एन्टरटेन्मेंट पार्क पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे

शॉपिंग मॉल आणि बाजार कॉम्पलेक्स 50 टक्के क्षमतेने सुरू रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. रात्री 10 ते सकाळी 5 हॉटेल बंद राहणार आहे.

होम डिलिव्हरी सुरु राहणार आहे नाट्यगृह, सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. क्षमता बोर्डावर प्रदर्शित करावी. नाट्यगृह, सिनेमागृहात संपूर्ण लसीकरण झालेल्यांनाच परवानगी मात्र रात्री 10 ते सकाळी 8 सिनेमागृहा बंद

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe