अहमदनगर ब्रेकिंग : एकाच अपघातात तीन भावांचा मृत्यू !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2021 :-  संगमनेर तालुक्यातून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे, इनोव्हा कारने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील पापा अब्दुल मणियार (वय ३२),

अन्सार अब्दुलकरीम मणियार (वय ३५) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा चुलत भाऊ समीर अहमद मणियार (वय २७, तळेगाव दिघे) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मंगळवारी दुपारी २ वाजता पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वरुडी फाटा पुलाजवळ हा अपघात झाला. तिघे मोटार सायकल (एम.एच. १२ डी.एफ. १७५८) वरुन बोटा येथे पाहुण्याकडे गेले होते.

परत येत असताना त्यांच्या दुचाकीला इनोव्हा कारने धडक दिली. अपघात होताच कार चालक फरार झाला. जखमी समीरला संगमनेरला कुटे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले, मात्र त्याचाही मृत्यू झाला. घारगाव पोलिसांनी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe